
भाग्यवेद अकॅडमी भुसावळ मध्ये 2 फेब्रुवारी 2025 रविवार या दिवशी दहावी सीबीएससी आणि दहावी स्टेट बोर्ड या विद्यार्थ्यांचा टेस्ट सिरीज चा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.
या बक्षीस वितरण समारंभामध्ये विद्यार्थ्यांना बोर्डाचे पेपर कसे लिहावे याचे मार्गदर्शन करण्यात आले. टेस्ट सिरीज मध्ये जानेवरी महीन्यामध्ये एकूण 15 पेपर घेऊन विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे मूल्यांकन करण्यात आले. अशाप्रकारे हा बक्षीस वितरण समारंभ पार पडला, त्यावेळी आलेले प्रमुख मान्यवर यांनी मोलाचे असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश नेमाडे, (माजी नगराध्यक्ष), अमित कुमार (प्रमुख अतिथी), अमित बागुल (उपनिरीक्षक बाजारपेठ पोलीस स्टेशन), राजेंद्र बाविस्कर (मुख्य अभियंता औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर) उपस्थित होते. तसेच भाग्यवेद अकॅडमीच्या संचालिका राजेश्वरी निळे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली आणि एन.पी. निळे (नहाटा कॉलेज, भुसावळ) यांनी विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज बद्दल सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खुशी मॅडम यांनी केले तसेच या कार्यक्रमात आलेल्या मान्यवरांचे तसेच पालकांचे व प्रिय विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार व कौतुक सर्वांनी व्यक्त केले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ