Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / महा ई-सेवा पोर्टल ठप्प; नागरिकांची गैरसोय, कारवाईची मागणी

महा ई-सेवा पोर्टल ठप्प; नागरिकांची गैरसोय, कारवाईची मागणी

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


जळगाव : जिल्ह्यातील ‘आपले सरकार सेवा केंद्र’ अंतर्गत महाआयटी कंपनी लिमिटेडद्वारे चालविले जाणारे ‘आपले सेवा सेतु केंद्र’ (महा ई-सेवा पोर्टल) मागील दोन ते तीन दिवसांपासून बंद असल्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

विविध शासकीय कामांसाठी आवश्यक असलेले दाखले मिळत नसल्याने विशेषतः विद्यार्थ्यांचे शालेय काम ठप्प झाले आहे.


महाआयटी कंपनी लिमिटेडच्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे पोर्टल सेवा खंडित झाली आहे. मात्र, या तांत्रिक अडचणींचा फटका थेट नागरिकांना बसत असून आवश्यक सेवा ठप्प झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.


दरम्यान, या संदर्भात अनेक नागरिक व विद्यार्थ्यांनी सामाजिक तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. त्यानंतर सानप यांनी जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार अर्ज सादर केला.

संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी तसेच महा ई-सेवा पोर्टल तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.


सदर प्रकारामुळे प्रशासनाच्या ऑनलाइन सेवा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe