Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळहून ‘विशेष आषाढी रेल्वे’ला हिरवा झेंडा; हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना

भुसावळहून ‘विशेष आषाढी रेल्वे’ला हिरवा झेंडा; हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जळगाव व बुलडाणा जिल्ह्यासह परिसरातील हजारो वारकरी मोठ्या उत्साहात भुसावळ रेल्वे स्थानकावर एकत्र आले.

अनारक्षित मोफत विशेष आषाढी रेल्वे गाडीने विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना होताना भाविकांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे विशेष रेल्वेची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार दुपारी 1.30 वाजता भुसावळ रेल्वे स्थानकावरून पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या विशेष रेल्वेला रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.

ही विशेष रेल्वे दि. 25 रोजी पहाटे 3.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचणार असून, त्याच दिवशी रात्री 10.30 वाजता पंढरपूरहून परतीच्या प्रवासाला निघेल. ही गाडी दि. 26 रोजी भुसावळ येथे परत येणार आहे.

या विशेष आषाढी रेल्वेसाठी आवश्यक असलेली सर्व जनरल तिकिटे स्वखर्चाने खरेदी करण्यात आली असून, वारकऱ्यांना ही सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा देत विठुरायाच्या दर्शनासाठी उत्साहात निरोप देण्यात आला.

या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

IND vs ENG: शुभमन गिल और अक्षर पटेल के दम पर भारत की धमाकेदार जीत, एजबेस्टन में 11 साल बाद इंग्लैंड को मिली वनडे हार

IND vs ENG: शुभमन गिल और अक्षर पटेल के दम पर भारत की धमाकेदार जीत, एजबेस्टन में 11 साल बाद इंग्लैंड को मिली वनडे हार

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading