Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / “कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

“कोट्यवधींचा खर्च, तरीही सुविधा नाहीत; भुसावळ नगरपरिषदेवर श्वेतपत्रिकेची मागणी”

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ | प्रतिनिधी : ‘अ’ वर्ग दर्जा असलेल्या भुसावळ नगरपरिषदेत कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिशिर दिनकर जावळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे मागील १५ वर्षांच्या नगरपरिषदेच्या कारभाराची ‘श्वेतपत्रिका’ (White Paper) प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात जावळे यांनी नमूद केले आहे की, भुसावळ नगरपरिषदेत शेकडो कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार होतात आणि शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होतो.

मात्र, शहरातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक स्वच्छतेची अवस्था अत्यंत दयनीय असून अनेक विकासकामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत, तर काही ठिकाणी कामेच झालेली नाहीत. त्यामुळे जनतेच्या करातून जमा झालेला निधी नेमका कुठे खर्च झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

जावळे यांनी निवेदनात तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये नगरपरिषदेच्या मागील १५ वर्षांच्या कामकाजाची व विकासकामांची उच्चस्तरीय चौकशी करून श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणे, प्राप्त निधी, झालेला खर्च आणि कामांचा दर्जा याचा सविस्तर लेखाजोखा जनतेसमोर मांडणे तसेच कामातील दिरंगाई व भ्रष्टाचारासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे, या मागण्यांचा समावेश आहे.

भुसावळकरांच्या संयमाचा अंत पाहू नये, असा इशारा देत शिशिर जावळे यांनी शहराच्या हितासाठी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या निवेदनामुळे भुसावळच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून या मागणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले; तापी नदीत ४९,५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले; तापी नदीत ४९,५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading