Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / “आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेची विशेष भेट; भुसावळ–पंढरपूरसह 16 विशेष फेऱ्या”

“आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेची विशेष भेट; भुसावळ–पंढरपूरसह 16 विशेष फेऱ्या”

Maharashtra News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष रेल्वे गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर–मिरज, नवी अमरावती–पंढरपूर, खामगाव–पंढरपूर आणि भुसावळ–पंढरपूर या मार्गांवर एकूण 16 विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

नागपूर–मिरज विशेष गाडी (क्र. 01205/01206) 23 ते 25 जुलैदरम्यान प्रत्येकी दोन फेऱ्या करणार असून या गाडीला भुसावळ, जळगाव, मनमाड, पंढरपूर आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

नवी अमरावती–पंढरपूर विशेष गाडी (क्र. 01119/01120) 21, 22, 24 आणि 25 जुलै रोजी धावणार असून विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील भाविकांसाठी ही सेवा उपयुक्त ठरणार आहे.

खामगाव–पंढरपूर विशेष गाडी (क्र. 01121/01122) 21 ते 24 जुलैदरम्यान प्रत्येकी दोन फेऱ्या करणार आहे. या गाडीला भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबा असेल.

याशिवाय, भाविकांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन भुसावळ–पंढरपूर अनारक्षित विशेष गाडी (क्र. 01159/01160) 24 ते 26 जुलैदरम्यान चार फेऱ्या करणार आहे. ही गाडी भुसावळहून दुपारी 1.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता पंढरपूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात पंढरपूरहून रात्री 10.30 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता भुसावळ येथे येईल. या गाडीत 16 सामान्य द्वितीय श्रेणी डबे उपलब्ध असतील.

मध्य रेल्वेने भाविकांना आगाऊ नियोजन करून प्रवास करण्याचे आवाहन केले असून विशेष गाड्यांमुळे आषाढी एकादशीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading