Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / रक्षाताई खडसे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मुक्ताईनगरात भाजपाचा मोर्चा; कठोर कारवाईची मागणी

रक्षाताई खडसे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मुक्ताईनगरात भाजपाचा मोर्चा; कठोर कारवाईची मागणी

मुक्ताईनगर न्यूज | ब्यूरो रिपोर्ट आकाश ढाके | खबर 24 एक्सप्रेस


मुक्ताईनगर प्रतिनिधी – केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष, मुक्ताईनगर तालुक्याच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

यानंतर तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

भाजपाने दिलेल्या निवेदनानुसार, नंदुरबार येथील विजय चौधरी या व्यक्तीने केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्याविषयी कथितरीत्या अश्लील, अवमानकारक आणि मानहानीकारक भाषा वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अशा प्रकारचे वक्तव्य हे सार्वजनिक जीवनातील महिलांच्या सन्मानाला धक्का देणारे असून समाजात चुकीचा संदेश देणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मोर्चादरम्यान भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रक्षाताई खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधी असून त्यांच्या संदर्भातील कथित आक्षेपार्ह वक्तव्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत.

त्यामुळे भारतीय न्याय संहिता (BNS), माहिती तंत्रज्ञान अधिनियम तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या मोर्चात भाजपा तालुका सरचिटणीस राजेंद्र सवळे, अतुल महाजन, पंकज कोळी, चंद्रकांत भोलाणे, ललिता महाजन, डॉ. प्रविण पाचपांडे, सचिन पाटील, माधुरी सचिन पाटील, साधना बापु ससाणे, नईम बागवान यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध आघाडी-सेलचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, मुक्ताईनगर


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में पहुंचा संत रविदास समरसता कलश रथ, 45 दिवसीय समरसता संकल्प अभियान का शुभारंभ

बुलंदशहर में पहुंचा संत रविदास समरसता कलश रथ, 45 दिवसीय समरसता संकल्प अभियान का शुभारंभ

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading