Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / आणीबाणीतील लोकशाही रक्षकांचा भाजपतर्फे गौरव; मिसाबंदी कार्यकर्त्यांचा भुसावळात सत्कार

आणीबाणीतील लोकशाही रक्षकांचा भाजपतर्फे गौरव; मिसाबंदी कार्यकर्त्यांचा भुसावळात सत्कार

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ (प्रतिनिधी) – देशात १९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या ज्येष्ठ मिसाबंदी कार्यकर्त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा भारतीय जनता पार्टी भुसावळ शहराच्या वतीने गौरव व सत्कार करण्यात आला.

भाजपा राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे व भुसावळ नगरपरिषदेच्या प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांच्या हस्ते या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.

कॅबिनेट मंत्री नामदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात आणीबाणीच्या काळातील संघर्ष, त्याग आणि लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आणीबाणीविरोधातील लढ्यातील कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा गौरव करत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी जिल्हा संयोजक केतकी पाटील, जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, जिल्हा सचिव प्रवीण इखणकर, भुसावळ उत्तर मंडळाध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण मंडळाध्यक्ष किरण कोलते, ग्रामीण मंडळाध्यक्ष गोलू पाटील, मंडळ संयोजक पिंटू कोठारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सत्कारमूर्तींमध्ये अरुण भावसार, जयंतीलाल सुराणा यांच्यासह दिवंगत कार्यकर्ते स्व. बाकीलालजी रणधीर, स्व. मुरलीधर जोशी, स्व. दत्तात्रय इखणकर, प्रकाश मुळे, कमलाबाई दगडू चौधरी आणि अरविंद वसंत जोशी यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास शहर सरचिटणीस जयंत माहुरकर, पवन बुंदेले, अमोल महाजन, दिनेश नेमाडे, बापू महाजन, सुजित भोळे, राजेंद्र आवटे, राजू खरारे, कैलास पाटील, रुपेश देशमुख, ललित मराठे, किरण पाटील, चंद्रशेखर अग्रवाल, शैलेजा पाटील, वैशाली सेतवाल, अनिता आंबेकर, प्राची पाटील, राहुल तायडे, ऋषभ सिंग राजपूत, भावेश चौधरी, अनिल पाटील, गोपी राजपूत, योगेंद्र हरणे, नंदकिशोर बडगुजर, संकल्प वाणी, गौरव आवटे, सुजित वानखेडे, चेतन सावकारे, अमित असोदेकर, हर्षल जोशी, नकुल महाजन, उदय पाटील, रोहन वारुळकर, सोनू अग्रवाल, सचिन बऱ्हाटे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, नगरसेवक, मोर्चा-आघाडीचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत माहुरकर यांनी केले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading