Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / नशिराबाद टोल नाक्यावर टोलवसुलीला नागरिकांचा ब्रेक; पाणी साचल्याने संताप, ‘आधी रस्ते सुधारा, मगच टोल घ्या’

नशिराबाद टोल नाक्यावर टोलवसुलीला नागरिकांचा ब्रेक; पाणी साचल्याने संताप, ‘आधी रस्ते सुधारा, मगच टोल घ्या’

जळगाव न्यूज | जिल्हा प्रतिनिधी : राजेंद्र परसे | खबर 24 खबर चौबीस एक्सप्रेस


जळगाव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नशिराबाद टोल नाका परिसरात गंभीर पाणी साचल्याची समस्या निर्माण झाली आहे. नशिराबाद पुलाखालील बोगद्यात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, त्याचा फटका सर्विस रोडलाही बसला आहे. परिणामी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी प्रभावी निचऱ्याची व्यवस्था नसल्याने दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होते. यामुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या समस्येविरोधात नशिराबाद येथील नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येत काही काळासाठी नशिराबाद टोल नाक्यावरील टोलवसुली बंद पाडली. यावेळी आधी रस्ते सुधारा, मगच टोल घ्या!” अशी जोरदार घोषणा देत संबंधित यंत्रणांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

या गंभीर परिस्थितीची माहिती राज्याचे मंत्री गिरीश महाजन तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. टोल आकारला जात असताना मूलभूत सुविधा आणि सुरक्षित रस्ते उपलब्ध करून देणे ही संबंधित यंत्रणांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पाणी निचऱ्याची कायमस्वरूपी व्यवस्था करून नागरिकांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी NHAI आणि प्रशासनाला दिला आहे.

राजेंद्र परसे
जिल्हा प्रतिनिधी, जळगाव
खबर 24 खबर चौबीस एक्सप्रेस


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

NEET पेपर लीक विवाद: बुलंदशहर में भीम आर्मी का कलेक्ट्रेट पर प्रदर्शन, छात्रों के समर्थन में सौंपा ज्ञापन

NEET पेपर लीक विवाद: बुलंदशहर में भीम आर्मी का कलेक्ट्रेट पर प्रदर्शन, छात्रों के समर्थन में सौंपा ज्ञापन

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading