जळगाव बातमी | प्रतिनिधी राजेंद्र परसे | खबर 24 एक्सप्रेस

देशभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅस सिलिंडर तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये सातत्याने होत असलेल्या वाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने वाशी येथे आंदोलन करण्यात आले. मात्र हे आंदोलन पोलिसांनी रोखल्याचा आरोप पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केला आहे.
महागाईच्या मुद्द्यावर सरकारविरोधात जनआक्रोश व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वारंवार होणारी वाढ, सीएनजी व घरगुती गॅस सिलिंडरचे गगनाला भिडलेले दर तसेच भाजीपाल्याच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
गृहिणींचे बजेट कोलमडले असून दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी आंदोलन करण्यात आले होते.
वाशी येथे आयोजित आंदोलन देखील पोलिसांनी रोखल्यामुळे लोकशाही मार्गाने आपला आवाज मांडण्याचा अधिकार हिरावला जात असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.
राजेंद्र परसे
जिल्हा प्रतिनिधी, जळगाव
खबर 24 एक्सप्रेस
रोहिणी खडसे आंदोलन, महागाई विरोधी आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, पेट्रोल डिझेल दरवाढ, गॅस सिलिंडर दरवाढ, वाशी आंदोलन, महाराष्ट्र राजकारण, रोहिणी खडसे बातमी, महागाईवर आंदोलन, NCP Sharad Pawar News.
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7
4 comments
Pingback: Jalgaon LCB big achievement; House burglary solved in 12 hours
Pingback: Nagpur Crime News, Theft desire to gift an iPhone to girlfriend,
Pingback: Delhi hotel fire, Screams, smoke death, Malviya Nagar Fire News
Pingback: Rakshatai Khadse reviews development Bhusawal Railway Division