Mumbai News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

मुंबई – अनुसूचित जमातीतील कोळी समाजाच्या प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुलभतेने मिळावे यासाठी शासनाने तातडीने परिपत्रक काढावे, अशी मागणी कोळी महासंघाचे नेते रमेशदादा पाटील यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्याकडे स्मरणपत्राद्वारे केली आहे.
महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीच्या विविध संघटनांनी सातत्याने केलेल्या आंदोलन, निवेदने आणि पाठपुराव्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या अध्यक्षतेखाली २० ऑक्टोबर २०२३ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत जात दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले होते.
मात्र त्यानंतर लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितांमुळे या निर्णयाची अंमलबजावणी रखडल्याचा आरोप कोळी महासंघाने केला आहे.
स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे की, समाजाच्या शैक्षणिक, रोजगार व आरक्षणासंदर्भातील अनेक प्रश्न जात वैधता प्रमाणपत्राअभावी प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे २० ऑक्टोबर २०२३ रोजीच्या बैठकीतील निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून संबंधित विभागामार्फत परिपत्रक जारी करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
कोळी समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तसेच रोजगार व आरक्षणाशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, मुंबई
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7
One comment
Pingback: Rohini Khadse stopped by police! Anti-inflation protest crushed