Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / खासदारांच्या वक्तव्यावर पत्रकारांचा संताप; कारवाईसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

खासदारांच्या वक्तव्यावर पत्रकारांचा संताप; कारवाईसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ (प्रतिनिधी): पत्रकारांविषयी कथित अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भुसावळ येथील मराठी पत्रकार संघाने खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष शेलोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी, भुसावळ यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, २५ जून रोजी पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांविषयी अवमानकारक व आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे. या वक्तव्यामुळे पत्रकारांच्या भावना दुखावल्या असून पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजहितासाठी निःपक्षपातीपणे कार्य करतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पत्रकारांविषयी संयमित, सन्मानपूर्वक व जबाबदारीची भाषा वापरणे अपेक्षित असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मराठी पत्रकार संघाने संबंधित वक्तव्याची सखोल चौकशी करून कायद्यानुसार योग्य ती कारवाई करावी, तसेच भविष्यात पत्रकारांना धमकी, अवमान किंवा कोणत्याही प्रकारची दडपशाही होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना करून पत्रकारांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

यावेळी कमलेश चौधरी, विनोद गोरधे, आकाश ढाके, मनोहर लोणे, किशोर सावळे, श्याम गोविंदा, सुनील आराक, प्रेम परदेशी, जोहेब सय्यद, गोपाल म्यांद्रे, कलीम पायलट, सद्दाम खाटीक, किशोर शिंपी, रफिक खान, नईम शेख, राजू चौधरी आदी पत्रकार उपस्थित होते.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

टीईटी पेपरफुटीवरून सरकारला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा थेट सवाल; “लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर दरोडा”

टीईटी पेपरफुटीवरून सरकारला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा थेट सवाल; "लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर दरोडा"

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading