मुक्ताईनगर न्यूज| प्रतिनिधी आकाश ढाके | खबर 24 एक्सप्रेस
मुक्ताईनगर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला असून अनेक एकरांवरील केळीची पिके जमीनदोस्त झाली आहेत.

पाहणीदरम्यान स्थानिक भाजप पदाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. रक्षाताई खडसे यांनी प्रशासनाला नुकसानग्रस्त भागातील पंचनामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मुक्ताईनगर परिसरातील अनेक गावांमध्ये केळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Tags
रक्षाताई खडसे, मुक्ताईनगर बातमी, अवकाळी पाऊस, केळी पिकांचे नुकसान, जळगाव न्यूज, अंतुर्ली गाव, शेतकरी नुकसानभरपाई, गारपीट नुकसान, महाराष्ट्र शेती बातम्या, मुक्ताईनगर शेतकरी, Raksha Khadse News, Banana Crop Damage Maharashtra, Jalgaon News, Farmers Loss Compensation, Muktainagar News.
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7