Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

मुर्तीजापुर : रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) द्वारे राबविण्यात येणाऱ्या “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अभियानांतर्गत हरवलेल्या एका 13 वर्षीय बालकाची त्याच्या पालकांशी सुखरूप पुनर्भेट घडवून आणण्यात आली. आरपीएफच्या तत्परतेमुळे आणि संवेदनशील कार्यपद्धतीमुळे ही कारवाई यशस्वी ठरली.
तक्रार मिळताच आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल गोपाल हरणे व कॉन्स्टेबल संदीप तायडे यांनी तातडीने कार्यवाही सुरू केली. गाडी मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर एस्कॉर्टिंग इंचार्ज सहाय्यक उपनिरीक्षक नितीन मिस्त्री यांच्या मदतीने संबंधित डब्यातून बालकाची ओळख पटवून त्याला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर बालकाला आरपीएफ पोलीस ठाणे, मूर्तिजापूर येथे आणण्यात आले.
बालकाचे आई-वडील आरपीएफ ठाण्यात दाखल झाल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक हरीश महल्ले यांनी बाल कल्याण समिती (सीडब्ल्यूसी), अकोला यांच्या निर्देशानुसार आवश्यक ओळख व पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर सौरभ याला सुखरूप अवस्थेत त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, मध्य रेल्वेने प्रवाशांना धावत्या रेल्वेत चढणे किंवा उतरणे टाळण्याचे तसेच रेल्वे परिसरात हरवलेली अथवा निराधार व्यक्ती आढळल्यास तात्काळ आरपीएफ किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. मदतीसाठी रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वर संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, मुर्तीजापुर
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7
One comment
Pingback: BJP holds district-level workshop in Jalgaon to celebrate Mod