Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / जळगाव एलसीबीची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा उलगडा, तीन आरोपी जेरबंद

जळगाव एलसीबीची मोठी कामगिरी; १२ तासांत घरफोडीचा उलगडा, तीन आरोपी जेरबंद

Jalgaon News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अवघ्या १२ तासांत छडा लावत परराज्यातील तीन आरोपींना नागपूर येथून अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे १६ लाख ३४ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे कामानिमित्त घराबाहेर गेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम लंपास केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी तसेच तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढला.


तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी नागपूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून राजू जसपालसिंग (वय ४२, रा. हरियाणा), भोला उर्फ बिरेंद्र सुखदेव पासवान (वय ४०, रा. बिहार) आणि राजेश पारस शाह (वय ५२, रा. बिहार) यांना ताब्यात घेतले.


चौकशीदरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले एकूण १६ लाख ३४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading