Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ तहसील कार्यालयातील अस्वच्छतेविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

भुसावळ तहसील कार्यालयातील अस्वच्छतेविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ : भुसावळ तहसील कार्यालय परिसरातील अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या गंभीर बाबीची दखल घेत पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या वतीने जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार तहसील कार्यालयातील फ्रीज परिसर तसेच शौचालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर घाण साचलेली असून दुर्गंधी पसरली आहे. परिणामी डास, माश्या व इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांनाही या अस्वच्छतेचा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’च्या उद्दिष्टांना हरताळ फासला जात असून पर्यावरण संरक्षण नियमांचेही उल्लंघन होत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, सार्वजनिक आरोग्य नियम तसेच घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 अंतर्गत अशा प्रकारची अस्वच्छता ही गंभीर व दंडनीय बाब असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणात संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर व शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच तहसील कार्यालय परिसराची तात्काळ स्वच्छता करून नियमित निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, सदर तक्रारीसोबत कार्यालयातील प्रत्यक्ष परिस्थिती आहे.

ही तक्रार पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे उत्तर महाराष्ट्र संघटक तथा जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading