Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले; तापी नदीत ४९,५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हतनूर धरणाचे २२ दरवाजे उघडले; तापी नदीत ४९,५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

भुसावळ प्रतिनिधी – सतत सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून, वाढती आवक लक्षात घेता आज सकाळी धरणाचे २२ रेडियल दरवाजे प्रत्येकी एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे तापी नदीपात्रात ४९ हजार ५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

आज सकाळी १० वाजेपर्यंत धरणाची पाणीपातळी २१२.१८० मीटर इतकी नोंदविण्यात आली. तसेच कालव्यातून ३०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

सध्या धरणातील एकूण पाणीसाठा ७४.४८ टक्क्यांवर पोहोचला असून, उपयुक्त जलसाठ्यातही सातत्याने वाढ होत आहे. प्रकल्प परिसरात आज २८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

धरण क्षेत्रात अजूनही पाण्याची आवक सुरू असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

कालबाह्य शासकीय वाहनांचा तात्काळ लिलाव करा; केदारनाथ सानप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कालबाह्य शासकीय वाहनांचा तात्काळ लिलाव करा; केदारनाथ सानप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading