Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / टीईटी पेपरफुटीवरून सरकारला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा थेट सवाल; “लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर दरोडा”

टीईटी पेपरफुटीवरून सरकारला राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा थेट सवाल; “लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर दरोडा”

जळगाव न्यूज | प्रतिनिधी राजेंद्र परसे | खबर 24 एक्सप्रेस


जलगांव : महाराष्ट्रातील टीईटी (Teacher Eligibility Test) परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरद पवार गट) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत, “टीईटीचा पेपर फुटला म्हणजे हा केवळ एका परीक्षेचा घोटाळा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टाकलेला दरोडा आहे,” असा आरोप केला आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले की, रात्रंदिवस अभ्यास करून प्रामाणिकपणे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पेपरफुटीमुळे पाणी फेरले जात आहे.

परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासच डळमळीत झाला असून, वारंवार होणाऱ्या अशा घटनांना जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

त्यांनी पुढे म्हटले की, प्रत्येक वेळी पेपरफुटी झाल्यानंतर चौकशीची घोषणा केली जाते, काही आरोपींना अटक होते आणि काही दिवसांत प्रकरण थंडावते. मात्र विद्यार्थ्यांचे गेलेले महिने, आर्थिक नुकसान, मानसिक ताण आणि करिअरमध्ये झालेला विलंब याची जबाबदारी कोण स्वीकारणार, याचे उत्तर सरकारने द्यावे.

नीट परीक्षा पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच टीईटी परीक्षेसाठी अधिक कडक सुरक्षा व्यवस्था अपेक्षित होती. मात्र त्यातही पेपरफुटी झाल्याच्या संशयामुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

“जे स्वतःच फोडाफोडीत व्यस्त आहेत, ते पेपरफुटी कशी रोखणार?” असा उपरोधिक सवाल करत त्यांनी सरकारवर टीका केली. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणामुळे टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून, पारदर्शक आणि विश्वासार्ह परीक्षा प्रणाली उभारण्याची मागणी जोर धरत आहे.

राजेंद्र परसे
जिल्हा प्रतिनिधी, जळगाव
खबर 24 खबर चौबीस एक्सप्रेस



Tags
टीईटी पेपरफुटी, TET Paper Leak, Maharashtra TET, महाराष्ट्र बातम्या, शिक्षण, परीक्षा, Paper Leak News, NCP Sharad Pawar, Jalgaon News, Education News, Breaking News Maharashtra


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

ब्रिटिश लोकशाहीचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी प्रा. डॉ. सुनील नेवे यांचा लंडन दौरा

ब्रिटिश लोकशाहीचा प्रत्यक्ष अभ्यास करण्यासाठी प्रा. डॉ. सुनील नेवे यांचा लंडन दौरा

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading