Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / ‘हर घर तिरंगा’चा जयघोष! भुसावळात विद्यार्थ्यांची भव्य सायकल रॅली

‘हर घर तिरंगा’चा जयघोष! भुसावळात विद्यार्थ्यांची भव्य सायकल रॅली

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ येथून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये ताप्ती पब्लिक स्कूलसह शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीचा संदेश दिला.

विद्यार्थ्यांनी आपल्या सायकलींना तिरंगा ध्वज लावून रॅलीत सहभाग घेतला. यावेळी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नागरिकांमध्येही राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली.

या सायकल रॅलीचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. कुलदीप ठाकरे, गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या नीना कटलर, सायकलिंग असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, भुसावळ वाहतूक शाखेचे PSI असलम खान, सहायक फौजदार संजय भदाणे, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुनील वानखडे आणि प्रा. मनोज वारके यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी ताप्ती स्कूलचे क्रीडा शिक्षक विजय संकत यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दल आदर, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. विद्यार्थ्यांनी तिरंगा घेऊन केलेली ही सायकल रॅली भुसावळकरांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

रक्षाताई खडसे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मुक्ताईनगरात भाजपाचा मोर्चा; कठोर कारवाईची मागणी

रक्षाताई खडसे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात मुक्ताईनगरात भाजपाचा मोर्चा; कठोर कारवाईची मागणी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading