Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ’ पुरस्काराने ओमकार क्रीडा संघाचा गौरव; महाबली क्रीडा प्रसारक मंडळाच्या कार्याला मानाची पावती

सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ’ पुरस्काराने ओमकार क्रीडा संघाचा गौरव; महाबली क्रीडा प्रसारक मंडळाच्या कार्याला मानाची पावती

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake| Khabar 24 Express


महाबली क्रीडा प्रसारक मंडळ, भुसावळ संचलित ओमकार क्रीडा संघ याला जळगाव जिल्हा कबड्डी क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ’ हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि क्रीडा रसिक स्पोर्ट्स क्लब, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ॲड. बबनभाऊ बाहेती यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कबड्डी महोत्सव व पुरस्कार सोहळ्यात हा गौरव करण्यात आला.

दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या या सोहळ्यात मुलांच्या गटातून ओमकार क्रीडा संघाने उत्कृष्ट शिस्त, संघभावना आणि सातत्यपूर्ण क्रीडा कार्याच्या जोरावर हा मानाचा पुरस्कार पटकावला. आमदार चंद्रकांत (अण्णा) सोनवणे (चोपडा) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी जळगाव महानगरपालिकेचे उपमहापौर मनोज चौधरी, शाम कोगता, नितीन बर्डे, ॲड. रोहन बाहेती, बशीर बागवान, छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेते प्रदीप तळवलकर आणि नारायण अप्पा खडके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ओमकार क्रीडा संघाच्या वतीने यश चौधरी, सचिन चितोडिया आणि प्रदीप महाजन यांनी पुरस्कार स्वीकारला.

या सन्मानामुळे महाबली क्रीडा प्रसारक मंडळ आणि ओमकार क्रीडा संघाच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीसह सातत्यपूर्ण क्रीडा योगदानाचा गौरव झाला असून, संघाचे खेळाडू, प्रशिक्षक आणि सर्व पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में पहुंचा संत रविदास समरसता कलश रथ, 45 दिवसीय समरसता संकल्प अभियान का शुभारंभ

बुलंदशहर में पहुंचा संत रविदास समरसता कलश रथ, 45 दिवसीय समरसता संकल्प अभियान का शुभारंभ

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading