Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ आगारातील बस बायपास जात असल्याने प्रवाशांची गैरसोय

भुसावळ आगारातील बस बायपास जात असल्याने प्रवाशांची गैरसोय

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake| Khabar 24 Express


भुसावळ : भुसावळ आगारातून येणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या अनेक एसटी बसगाड्या ठराविक थांबे वगळून थेट बायपास मार्गाने जात असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

विशेषतः ग्रामीण भागातील तसेच दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना अपेक्षित थांब्यावर बस न थांबल्यामुळे अतिरिक्त प्रवास, वेळेचा अपव्यय आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, नियोजित थांब्यांवर बस न थांबल्याने विद्यार्थी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अडचणी निर्माण होत आहेत. अनेक वेळा बसची वाट पाहूनही गाडी न थांबता बायपास मार्गाने निघून जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन बसचालक व वाहकांना नियोजित थांब्यांवर बस थांबविण्याबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात, तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा नियमित व नियमानुसार चालवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी परिवहन प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून बायपासमार्गे जाणाऱ्या बसगाड्यांवर नियंत्रण आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

भुसावळहून ‘विशेष आषाढी रेल्वे’ला हिरवा झेंडा; हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना

भुसावळहून ‘विशेष आषाढी रेल्वे’ला हिरवा झेंडा; हजारो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे रवाना

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading