Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे यांची निवड

मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी संतोष शेलोडे यांची निवड

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


मराठी पत्रकार संघाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी भुसावळ येथील खान्देश लाईव्ह न्यूजचे संपादक संतोष खंडू शेलोडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे भुसावळसह जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मुंबई येथे संपन्न झालेल्या मराठी पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, उपाध्यक्ष विवेक इनामदार, प्रदेश सचिव हरीभाऊ प्रक्षाळे तसेच प्रदेश संघटक संदीप पारोळेकर यांच्या हस्ते शेलोडे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

या अधिवेशनास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच प्रख्यात प्रेरणादायी वक्ते स्वामी गौर गोपाल दास यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारिता क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव, कार्यक्षमता आणि संघटनात्मक योगदानाचा विचार करून संतोष शेलोडे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिवेशनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. भुसावळ येथून पत्रकार कमलेश चौधरी, श्याम गोविंदा, वसंत कोलते, विनोद गोरधे आणि किशोर सावळे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.

नियुक्तीनंतर बोलताना संतोष शेलोडे यांनी पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ठामपणे आवाज उठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading