Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ रेल्वे मंडळातील विकास कामांचा रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा; प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

भुसावळ रेल्वे मंडळातील विकास कामांचा रक्षाताई खडसे यांनी घेतला आढावा; प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर तत्काळ तोडगा काढण्याचे निर्देश

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळांतर्गत सुरू असलेल्या विविध रेल्वे विकास कामांचा आणि प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी डीआरएम कार्यालय, भुसावळ येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

या बैठकीत रावेर लोकसभा मतदारसंघातील विविध रेल्वे स्थानकांवर सुरू असलेल्या विकासकामांची प्रगती, प्रवाशांच्या सोयीसुविधा तसेच महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी डीआरएम श्री. पुनित अग्रवाल उपस्थित होते.

बैठकीत “पाचोरा–जामनेर” पीजे रेल्वे विस्तारीकरण प्रकल्प तसेच “भुसावळ ते खंडवा” तिसरी व चौथी रेल्वे लाईन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली. प्रकल्पांची गती वाढवून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना देण्यात आल्या.

तसेच रावेर लोकसभा क्षेत्रातील नांदुरा, मलकापूर, बोदवड, वरंगाव, निंभोरा, सावदा आणि रावेर या प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही निर्देश देण्यात आले.

रेल्वे प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध अडचणींची दखल घेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- ‘बात बंद कर दी थी’, एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- 'बात बंद कर दी थी', एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading