महाराष्ट्र न्यूज | ब्यूरो रिपोर्ट आकाश ढाके | खबर 24 एक्सप्रेस

परिणामी जात, उत्पन्न, रहिवासी, राष्ट्रीयत्व तसेच इतर आवश्यक दाखल्यांसाठी केलेले हजारो अर्ज प्रलंबित राहिले असून विद्यार्थी, पालक आणि महा ई-सेवा केंद्र चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दहावी व बारावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेशासाठी आवश्यक असलेले विविध दाखले वेळेत मिळत नसल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. अनेक अर्जदारांनी दाखल्यांसाठी अर्ज करूनही सर्व्हर डाऊन असल्यामुळे संबंधित प्रक्रिया पूर्ण होत नसल्याची माहिती मिळत आहे.
सर्व्हरची समस्या तातडीने दूर करून प्रलंबित अर्ज निकाली काढावेत तसेच शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेचा विचार करून दाखले उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी विद्यार्थी, पालक व ई-सेवा केंद्र चालकांकडून करण्यात येत आहे. संबंधित विभागाकडून सर्व्हर पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7