Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

‘१०० कोटी गेले कुठे?’ भुसावळच्या अमृत योजनेवर देवेंद्र वराडे यांचा सवाल
भुसावळ : शहरातील दूषित व अनियमित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, अमृत पाणीपुरवठा योजनेअंतर्गत खर्च झालेल्या १०० कोटी रुपयांहून अधिक निधीच्या कामांची उच्चस्तरीय चौकशी व विशेष लेखापरीक्षण (स्पेशल ऑडीट) करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे यांनी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
दरम्यान, नाहाटा चौफुली परिसरातील जलकुंभ अनेक वर्षांपासून स्वच्छ करण्यात आलेला नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या जलकुंभात हिरवे, जंतूयुक्त पाणी साचलेले असून तेच पाणी नागरिकांना पुरविले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच जलकुंभाची इमारत अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून ती कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रमुख मागण्या :
१) नाहाटा चौफुली येथील जीर्ण जलकुंभाची तातडीने तांत्रिक तपासणी करावी.
२) जलकुंभाची स्वच्छता करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा.
३) दूषित पाणीपुरवठ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.
४) अमृत योजनेच्या निधीचे विशेष ऑडीट व स्वतंत्र चौकशी करावी.
५) मंजूर कामे, पूर्ण झालेली कामे व खर्चाचा तपशील जाहीर करावा.
६) भुसावळकरांना नियमित व वेळेवर पाणीपुरवठा सुनिश्चित करावा.
भुसावळकरांच्या आरोग्याशी होत असलेला हा कथित खेळ थांबवून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देवेंद्र वराडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7