Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या जनकल्याणकारी वाटचालीसाठी भाजपाची जळगावात जिल्हास्तरीय कार्यशाळा

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या जनकल्याणकारी वाटचालीसाठी भाजपाची जळगावात जिल्हास्तरीय कार्यशाळा

Jalgaon News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्ह्याच्या वतीने शहरातील ब्राम्हण सभा सभागृहात “मोदी सरकारची १२ वर्षे : विश्वास, विकास आणि जनकल्याण” या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत आगामी जनसंपर्क अभियानाची रूपरेषा मांडण्यात आली.

कार्यशाळेला उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख आमदार अनुपभैय्या अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले, तर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळातील विकासकामे, जनकल्याणकारी योजना आणि त्यांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

देशभरात ५ जून ते २१ जून २०२६ या कालावधीत या अभियानांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. जागतिक पर्यावरण दिन, आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच २५ जून रोजी “आपत्काल के ५१ साल” या विशेष कार्यक्रमांचाही त्यात समावेश आहे.

या अभियानाद्वारे विकसित भारत संकल्प संमेलन, विशेष जनसंपर्क अभियान, प्रगती पथ यात्रा, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पत्रकार परिषद तसेच विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून केंद्र सरकारच्या गेल्या १२ वर्षांतील विकासकामे व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष (पूर्व) चंद्रकांत बाविस्कर, जिल्हाध्यक्ष (पश्चिम) राधेश्याम चौधरी, जिल्हाध्यक्ष (जळगाव शहर) दीपक सूर्यवंशी, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. राजेंद्र फडके, नंदकिशोर महाजन, अशोक कांडेलकर, महापौर दिपमाला काळे, डॉ. केतकी पाटील यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

सचिन पायलट का वागड़ दौरा कल, साबला-आसपुर में भव्य स्वागत की तैयारियां तेज, शहरभर में लगे होर्डिंग और स्वागत द्वार

सचिन पायलट का वागड़ दौरा कल, साबला-आसपुर में भव्य स्वागत की तैयारियां तेज, शहरभर में लगे होर्डिंग और स्वागत द्वार

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading