Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वरणगावात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वरणगावात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वरणगाव येथील शिव कॉलनी व मच्छिंद्र नगर परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. हरित परिसर निर्मिती व पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत आवश्यकता असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या उपक्रमास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभाग नोंदविला.

कार्यक्रमास कल्पतरू निसर्ग सेवा मंडळाचे डॉ. रवींद्र माळी, डॉ. नितीन बढे, नगरसेवक विनोद झोपे, प्रशांत चौधरी सर, प्रा. भागवत पाटील, कैलास पाटील, सागर नागे, सारंग जोशी व संजय काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

“एक झाड लावा, पर्यावरण वाचवा” हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

सचिन पायलट का वागड़ दौरा कल, साबला-आसपुर में भव्य स्वागत की तैयारियां तेज, शहरभर में लगे होर्डिंग और स्वागत द्वार

सचिन पायलट का वागड़ दौरा कल, साबला-आसपुर में भव्य स्वागत की तैयारियां तेज, शहरभर में लगे होर्डिंग और स्वागत द्वार

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading