Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ (प्रतिनिधी) : प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ व पेयसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविली. वाणिज्य विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने २८ मे ते १० जून २०२६ या कालावधीत विविध रेल्वे स्थानके व गाड्यांमध्ये ही मोहीम पार पडली.
तपासणीदरम्यान एकूण ३०५ अनधिकृत विक्रेते आढळून आले. त्यापैकी ६७ जणांविरुद्ध दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली असून ९७ हजार ९५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच खाद्यपदार्थ आणि पेयपदार्थ खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनधिकृत विक्रेत्यांकडून विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रारी येत असल्याने अशा विक्रेत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांच्या हिताला व सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत भविष्यातही अशा विशेष तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार आहेत.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7
2 comments
Pingback: Passengers inconvenienced as buses from Bhusawal depot bypass
Pingback: Prestigious SKOCH Award for MS-CIT, Maharashtra shines