Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / MS-CIT ला प्रतिष्ठित SKOCH Award; डिजिटल साक्षरतेत महाराष्ट्राची राष्ट्रीय पातळीवर चमक

MS-CIT ला प्रतिष्ठित SKOCH Award; डिजिटल साक्षरतेत महाराष्ट्राची राष्ट्रीय पातळीवर चमक

Maharashtra News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (MKCL) यांच्या राज्यव्यापी डिजिटल साक्षरता उपक्रम MS-CIT ला देशातील प्रतिष्ठित SKOCH Award प्रदान करण्यात आला आहे.

Digital Literacy या श्रेणीत मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान MKCL च्या गेल्या २५ वर्षांतील डिजिटल शिक्षण, कौशल्य विकास, सामाजिक समावेशन आणि नागरिक सक्षमीकरणातील उल्लेखनीय योगदानाची दखल मानली जात आहे.

SKOCH Award हा शासन, डिजिटल परिवर्तन, सामाजिक विकास आणि कौशल्यवृद्धी क्षेत्रातील उत्कृष्ट उपक्रमांना दिला जाणारा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार आहे. MS-CIT ने महाराष्ट्रातील कोट्यवधी विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार, उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना आत्मविश्वासाने डिजिटल युगात सक्षम बनविण्याचे कार्य केले आहे.

या यशाबद्दल MKCL चे व्यवस्थापकीय संचालक समीर पांडे यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की, हा पुरस्कार संपूर्ण MKCL परिवारासाठी अभिमानाचा क्षण आहे.

कोट्यवधी विद्यार्थी, पालक, हजारो केंद्रप्रमुख, प्रशिक्षक, नेटवर्क पार्टनर्स, MSBTE, MKCL मधील सहकारी, संस्थापक मार्गदर्शक आणि महाराष्ट्र शासनाच्या पाठबळामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या ५,००० हून अधिक अधिकृत शिक्षण केंद्रांद्वारे MS-CIT ने ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांपर्यंत दर्जेदार व परवडणारे डिजिटल शिक्षण पोहोचवले आहे. बदलत्या तंत्रज्ञानाच्या गरजा लक्षात घेऊन अभ्यासक्रमात Artificial Intelligence (AI), Cyber Security, Data Literacy, Cloud Computing आणि आधुनिक डिजिटल साधनांचा समावेश करण्यात आला आहे.

या राष्ट्रीय सन्मानामुळे महाराष्ट्राला अधिक डिजिटलदृष्ट्या साक्षर, तंत्रज्ञान-सक्षम आणि AI-Ready बनविण्याच्या MS-CIT च्या प्रयत्नांना नवी ऊर्जा मिळाली असून, डिजिटल परिवर्तनाची ही चळवळ आणखी व्यापक करण्याचा निर्धार MKCL ने व्यक्त केला आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading