Raksha Khadse | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

लडाख : केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘वायब्रंट व्हिलेज प्रोग्राम’ अंतर्गत ११ ते १३ जून २०२६ या कालावधीत लडाखमधील सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या सीमावर्ती भागांचा तीन दिवसांचा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात सीमावर्ती गावांतील विकासकामांचा आढावा घेण्याबरोबरच स्थानिक नागरिक, युवक आणि सुरक्षा दलांशी संवाद साधण्यात आला.
११ जून रोजी लेह येथील ‘हॉल ऑफ फेम’ स्मारकाला भेट देऊन रक्षा खडसे यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य, शिस्त आणि देशभक्ती ही संपूर्ण राष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
यानंतर सरपंचांच्या निवासस्थानी झालेल्या संवादात युवकांशी कौशल्य विकास, क्रीडा, रोजगारनिर्मिती आणि गावांच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच आयटीबीपी कॅम्पला भेट देऊन त्यांनी जवानांशी संवाद साधला व प्रतिकूल हवामानात देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या हिमवीरांच्या कार्याचे कौतुक केले.
दौऱ्याच्या समारोपप्रसंगी रक्षा खडसे म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील सीमावर्ती गावे आता ‘शेवटची गावे’ नसून ‘पहिली गावे’ म्हणून विकसित होत आहेत. विकसित भारत २०४७च्या संकल्पपूर्तीसाठी सीमावर्ती भागातील युवकांची ऊर्जा आणि सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे.”
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, लडाख
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7