Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भागपूरसह परिसरात कुष्ठरोग शोध अभियानाला वेग; आरोग्य पथकाचे घरोघरी सर्वेक्षण

भागपूरसह परिसरात कुष्ठरोग शोध अभियानाला वेग; आरोग्य पथकाचे घरोघरी सर्वेक्षण

Jalgaon Breaking News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


जळगाव : आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘शून्य कुष्ठरुग्ण प्रसार शोध अभियान’ अंतर्गत जळगाव तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र कंडारी अंतर्गत भागपूर, उमाळा व देव्हारी येथे विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येत आहे. १५ मे ते १५ जून या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात हे अभियान सुरू आहे.

जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर व कुष्ठरोग सहाय्यक संचालक डॉ. इरफान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे. तसेच जळगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबादचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणव भदादे व तालुका कुष्ठरोग तंत्रज्ञ अनिल नन्नवरे यांच्या सूचनेनुसार गावांमध्ये तपासणी मोहीम सुरू आहे.

अभियानादरम्यान आरोग्य पथकाने भागपूर गावात घरोघरी जाऊन संशयित कुष्ठरुग्णांची तपासणी केली. यामध्ये आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके, आरोग्य सेविका योगिता कोकाटे तसेच सीएचओ शिरीन पाटील यांनी सहभाग घेतला. नागरिकांना कुष्ठरोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय व उपचारांविषयी माहिती देत जनजागृती करण्यात आली.

मागील पाच वर्षांपासून एकही कुष्ठरुग्ण न आढळलेल्या गावांमध्ये विशेष सर्वेक्षण करून संभाव्य रुग्णांचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. कुष्ठरोगाचे लवकर निदान झाल्यास औषधोपचाराद्वारे आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो व त्याचा प्रसार रोखण्यास मदत होते. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य पथकास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

“राजनीति में भाषा की मर्यादा रखें…” हर्षवर्धन सपकाल पर गरजे चंद्रशेखर बावनकुले, बोले कार्यकर्ताओं का बढ़ सकता आक्रोश

"राजनीति में भाषा की मर्यादा रखें…” हर्षवर्धन सपकाल पर गरजे चंद्रशेखर बावनकुले, बोले कार्यकर्ताओं का बढ़ सकता आक्रोश

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading