Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री संजय सावकारे यांचा वरणगाव दौरा दुचाकीवरून

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री संजय सावकारे यांचा वरणगाव दौरा दुचाकीवरून

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


वरणगाव (ता. भुसावळ) : पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजय सावकारे यांनी आज भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे आयोजित द्वार दर्शन कार्यक्रमासाठी दुचाकीने प्रवास केला. त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये इंधन बचत व पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश पोहोचला.


वरणगाव येथे आयोजित द्वार दर्शन कार्यक्रमासाठी मंत्री संजय सावकारे यांनी साधेपणाने दुचाकीवरून प्रवास करत सर्वसामान्य नागरिकांशी थेट संवाद साधला.

यावेळी त्यांनी इंधनाची बचत ही काळाची गरज असल्याचे सांगत नागरिकांनी शक्य त्या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक, सायकल किंवा दुचाकीचा वापर करून पर्यावरण रक्षणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले.


त्यांच्या या अनोख्या प्रवासामुळे रस्त्यावरील नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी मंत्री सावकारे यांच्या या उपक्रमाचे स्वागत करत इंधन बचतीसाठी अशा कृतीतून जनजागृती होण्याची गरज व्यक्त केली.


द्वार दर्शन कार्यक्रमादरम्यान विविध विकासकामांबाबत नागरिकांच्या समस्या व मागण्या जाणून घेण्यात आल्या. स्थानिक नागरिकांनीही मंत्री सावकारे यांच्याशी संवाद साधत परिसरातील प्रश्न मांडले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.


मंत्री संजय सावकारे यांच्या या दुचाकी प्रवासाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली असून, ‘इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षण’ या संदेशाला प्रत्यक्ष कृतीची जोड दिल्याबद्दल नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत भुसावळात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा जल्लोष

रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत भुसावळात जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा जल्लोष

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading