वरणगाव न्यूज | ब्यूरो रिपोर्ट आकाश ढाके | Khabar 24 Express

वरणगाव – महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ टप्पा क्रमांक १ अंतर्गत वरणगाव नगरपरिषद आवारात विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध शासकीय योजनांचा लाभ देत सुमारे ६५० लाभार्थ्यांना सेवा पुरविण्यात आली.
शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. संजयजी सावकारे होते. यावेळी वरणगाव नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष अरुणाताई इंगळे, भुसावळ उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसीलदार नीता लबडे यांनी प्रास्ताविकातून शिबिराच्या उद्देशाची माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांविषयी मार्गदर्शन केले. नायब तहसीलदार पूजा अवघडे यांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनांमधील बदलांची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्राम महसूल अधिकारी रेणुका पाटील यांनी केले. मंडळ अधिकारी रजनी तायडे व सुप्रिया बिराजदार यांनीही मार्गदर्शन केले.
शिबिरात विशेष सहाय्य योजना लाभ २९, ई-शिधापत्रिका ९०, उत्पन्न-जात-अधिवास प्रमाणपत्र १२५०, जिवंत ७/१२ उतारे ५५, ‘माझा ७/१२ अचूक ७/१२’ मोहिमेंतर्गत ८२ उतारे, अपाक शेरा कमी ९, फेरफार निर्गती ६५, तुकडा शेरा कमी २० अशी कामे करण्यात आली.
तसेच ‘लेक लाडकी’ बेबी किटचे ३ लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत एका लाभार्थ्यास घराची चावी तर दोन लाभार्थ्यांना बांधकाम परवान्यांचे वितरण करण्यात आले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, वरणगाव
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7