Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / विनापरवाना वृक्षतोड प्रकरण तापले; दोषींवर गुन्हा दाखल करा, अन्यथा उपोषण — पर्यावरण समिती

विनापरवाना वृक्षतोड प्रकरण तापले; दोषींवर गुन्हा दाखल करा, अन्यथा उपोषण — पर्यावरण समिती

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake Khabar 24 Express



भुसावळ : शहरातील आदर्श शाळेबाहेर असलेल्या तीन मोठ्या हिरव्यागार वृक्षांची विनापरवाना कत्तल करण्यात आल्याचा आरोप करत ‘पर्यावरण संवर्धन व विकास समिती’ने आक्रमक भूमिका घेतली आहे. संबंधित शाळा प्रशासन व दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, अन्यथा २८ मेपासून नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे.


यासंदर्भात समितीच्या वतीने मुख्याधिकारी व प्रभारी नगराध्यक्षांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भरदिवसा कोणतीही अधिकृत परवानगी न घेता वृक्षतोड करण्यात आली असून, हा प्रकार ‘महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम १९७५’ मधील कलम ८ चे थेट उल्लंघन आहे…


नगरपरिषदेचे अधिकारी धनराज बाविस्कर यांनीही या वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा समितीने केला आहे. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ कारवाई करून FIR दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.


समितीने प्रशासनाला २७ मे २०२६ पर्यंत मुदत दिली असून, त्यानंतरही ठोस कारवाई न झाल्यास २८ मे रोजी सकाळी ११ वाजेपासून नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.


या निवेदनावर पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष देवेंद्र वराडे (अप्पा), तालुकाध्यक्ष पवन नाले, मुरलीधर लोखंडे, शेखर धांडे, प्रांजल पाटील, दीपक वाणी, मयूर सुरवाडे यांच्यासह अनेक भुसावळकर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या घटनेमुळे शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading