Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / अकोला–तिरुपती विशेष गाडी आता नियमित सेवेत; नवीन क्रमांक जाहीर

अकोला–तिरुपती विशेष गाडी आता नियमित सेवेत; नवीन क्रमांक जाहीर

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


अकोला–तिरुपती दरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांना नियमित दर्जा देत रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी मोठा दिलासा दिला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवास अधिक सुलभ आणि नियोजित होणार आहे.

पूर्वी 07605/07606 या क्रमांकाने धावणाऱ्या साप्ताहिक विशेष गाड्यांचे आता नियमित गाड्यांमध्ये रूपांतर करण्यात आले असून त्या पुढीलप्रमाणे चालतील :

गाडी क्रमांक 17430 (अकोला–तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस)

दिनांक 03 मे 2026 पासून दर रविवारी अकोला येथून सकाळी 08:10 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी 08:30 वाजता तिरुपती येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 17429 (तिरुपती–अकोला साप्ताहिक एक्सप्रेस)

दिनांक 08 मे 2026 पासून दर शुक्रवारी तिरुपती येथून दुपारी 12:25 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी 02:00 वाजता अकोला येथे पोहोचेल.

महत्त्वाचे थांबे :

वाशीम, हिंगोली डेक्कन, बसमत, पूर्णा, हजूर साहिब नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कमरेड्डी, मेदचल, काचीगुडा, मेहबूबनगर, वनपर्ती रोड, गडवाल, करनूल सिटी, धोने, अनंतपूर, धर्मावरम, कदिरि, मुलकला चेरुवु, मदनपल्ली, पीलेर, पकाला.

डब्यांची रचना –

१ वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, १० शयनयान, १ पेंट्री कार, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, २ सामान व गार्ड ब्रेक व्हॅन.

प्रवाशांनी कृपया गाडी क्रमांकातील बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, अकोला


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading