Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / डिजिटल जनगणना 2027: नागरिकांसाठी ‘स्व-गणना’ची सुविधा सुरू; 1 मेपासून नोंदणी

डिजिटल जनगणना 2027: नागरिकांसाठी ‘स्व-गणना’ची सुविधा सुरू; 1 मेपासून नोंदणी

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ (प्रतिनिधी) : देशातील आगामी जनगणना 2027 ही भारताच्या इतिहासातील पहिली डिजिटल जनगणना ठरणार असून, यामध्ये नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदवण्याची ‘स्व-गणना’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या उपक्रमामुळे जनगणना प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी ठरणार आहे.


या सुविधेमुळे नागरिकांना आता प्रगणकाची वाट पाहण्याची आवश्यकता नसून, ते स्वतः अधिकृत संकेतस्थळ https://se.census.gov.in⁠� वर जाऊन आपल्या कुटुंबाची माहिती भरू शकतात. मोबाईल क्रमांकाच्या सहाय्याने OTP द्वारे लॉगिन करून कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती भरल्यानंतर ‘सबमिट’ केल्यावर संदर्भ क्रमांक प्राप्त होतो. प्रगणक घरी आल्यावर हा क्रमांक दाखवणे पुरेसे राहणार आहे.


स्व-गणनेमुळे माहितीची अचूकता वाढण्यासोबतच वैयक्तिक माहितीची गोपनीयता अधिक सुरक्षित राहणार आहे. तसेच, घरबसल्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण करता येणार असल्याने नागरिकांचा वेळ व श्रमही वाचणार आहेत.


दरम्यान, स्व-गणना पोर्टल 1 मे 2026 ते 15 मे 2026 या कालावधीत सुरू राहणार आहे. त्यानंतर 16 मे 2026 ते 14 जून 2026 दरम्यान घर सूचीकरण व घरगणना टप्पा पार पडणार आहे.


उपविभागीय अधिकारी व जनगणना चार्ज अधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “जनगणना हा राष्ट्रीय विकासाचा पाया आहे. नागरिकांनी या डिजिटल उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या कुटुंबाची माहिती अचूकपणे भरावी.” तांत्रिक अडचणींसाठी पोर्टलवरील हेल्पडेस्क सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.


“आपली माहिती, आपला सहभाग – देशाच्या प्रगतीला मिळेल वेग!” असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading