Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / गोमातेला ‘राष्ट्रीय माता’ दर्जासाठी भुसावळात जनआक्रोश; हजारो स्वाक्षऱ्यांसह तहसीलवर धडक

गोमातेला ‘राष्ट्रीय माता’ दर्जासाठी भुसावळात जनआक्रोश; हजारो स्वाक्षऱ्यांसह तहसीलवर धडक

Bhusawal News • Bureau Report Akash Dhake • Khabar 24 Express


भुसावळ (प्रतिनिधी) : देशभर एकाच दिवशी राबविण्यात आलेल्या ‘गोसन्मान अभियान’ अंतर्गत भुसावळ शहरात गोरक्षक, गोसेवक व गोभक्तांच्या वतीने स्वाक्षरी अभियान आयोजित करण्यात आले. गोमातेला ‘राष्ट्रीय माता’ म्हणून सन्मान प्राप्त व्हावा तसेच नंदी देवांच्या संरक्षणासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, या मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.


या अभियानात असंख्य गोभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वाक्षऱ्या केल्या. संकलित स्वाक्षऱ्यांसह तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले.


दरम्यान, अष्टभुजा देवी माता मंदिर ते तहसील कार्यालय अशी रॅली काढण्यात आली. रणरणत्या उन्हात रोहित महाले यांनी अनवाणी पायांनी ही रॅली पूर्ण करत लक्ष वेधले.


गोभक्तांनी शासनाकडे मागणी करताना म्हटले की, राज्यात आजही गोवंश हत्या सुरू असून, गोतस्कर व कसाई यांच्याकडून गोमातेला धोका कायम आहे.

‘राज्यमाता’ दर्जा असतानाही ही परिस्थिती कायम राहणे ही शोकांतिका असल्याचे त्यांनी नमूद केले. गोमाता व नंदी देवांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने तातडीने घ्यावी, गोवंश हत्या पूर्णतः बंद करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


मागण्या मान्य न झाल्यास संत, महंत, गोभक्त व गोरक्षक अन्न-पाणी त्याग आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला.
या उपक्रमासाठी संत गेंदालाल महाराज, विजुजी महाराज, शितल चौधरी, महिमा कोलते, रितेश जैन, मुकेश गुंजाळ, जीतू जाट, पवन नाले, आदित्य धायडे, कुणाल शिंदे, शुभम रुमकर, भुषण महाजन, उमेश जोशी, अनिकेत पाटील, कृष्णा साळी, चेतन ठाकुर, किरण पाटील, अनिकेत साळी, सौरभ यादव आदींसह समस्त गोभक्तांनी परिश्रम घेतले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

भुसावळ Breaking: नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध; जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ

भुसावळ Breaking: नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध; जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading