Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / महा ऑनलाइन सर्व्हर बंद; शैक्षणिक दाखले व शासकीय सेवांसाठी पालक-मुलांची वणवण

महा ऑनलाइन सर्व्हर बंद; शैक्षणिक दाखले व शासकीय सेवांसाठी पालक-मुलांची वणवण

Bhusawal Breaking News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


राज्यातील महा ऑनलाईन पोर्टलचा सर्व्हर बंद पडल्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः शाळा-कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेले शैक्षणिक दाखले, जात/उत्पन्न प्रमाणपत्रे तसेच विविध शासकीय योजनांसाठी लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची अक्षरशः वणवण सुरू आहे.


ऑनलाईन प्रक्रियेमुळे कामे जलद होण्याऐवजी सर्व्हर डाऊनमुळे अर्ज सादर करणे, कागदपत्रे अपलोड करणे आणि प्रमाणपत्रे डाउनलोड करणे ही कामे ठप्प झाली आहेत. परिणामी विद्यार्थी व पालकांना सेवा केंद्रांपासून तहसील कार्यालयांपर्यंत वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.


दरम्यान, संबंधित विभागाकडून सर्व्हर लवकरात लवकर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी नागरिकांना होणारा त्रास तात्काळ कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी जोर धरत आहे.


स्थानिक पातळीवरही सेवा केंद्रांवर नागरिकांची गर्दी वाढली असून, “ऑनलाईन सेवा” हीच मोठी अडचण ठरत असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading