Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / कंडारी येथे जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

कंडारी येथे जागतिक हिवताप दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

Bhusawal Breaking News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express



हिवताप (मलेरिया) निर्मूलनासाठी जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देत नशिराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कंडारी (ता. जळगाव) येथील आरोग्य उपकेंद्राच्या कार्यक्षेत्रात जागतिक हिवताप दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

“Driven to end malaria, now we can, now we must” (हिवताप निर्मूलनासाठी आपण सक्षम आहोत — आता आपण कृती केलीच पाहिजे) या घोषवाक्याच्या माध्यमातून नागरिकांना सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले.

मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे यांच्या सूचनेनुसार वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव जाधव व डॉ. अजय पाल यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

हिवताप हा डासांद्वारे पसरणारा गंभीर आजार असून, वेळेवर निदान व उपचार न झाल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. याची दखल घेत गावपातळीवर कंटेनर सर्वेक्षण, तापग्रस्त रुग्णांची तपासणी, रक्त नमुने घेणे, आवश्यक औषधोपचार आणि परिसर स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे.

हिवताप प्रतिबंधासाठी घराभोवती पाणी साचू न देणे, मच्छरदाणीचा वापर करणे, पूर्ण अंग झाकणारे कपडे घालणे, डास प्रतिबंधक उपायांचा अवलंब करणे आणि ताप आल्यास त्वरित आरोग्य केंद्रात जाऊन रक्त तपासणी करून घेणे, असे महत्त्वपूर्ण संदेश आरोग्य सेवक सुनील गोविंद ढाके यांनी नागरिकांना दिले.

या कार्यक्रमास समुदायी आरोग्य अधिकारी डॉ. शिरीन कमलाकर पाटील तसेच आशा सेविका उपस्थित होत्या.


*ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव*



Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

Varanasi Breaking News: अहिल्याबाई घाट पर डूबने से बचीं तीन जिंदगियां, जल पुलिस की तत्परता से टला बड़ा हादसा

Varanasi Breaking News: अहिल्याबाई घाट पर डूबने से बचीं तीन जिंदगियां, जल पुलिस की तत्परता से टला बड़ा हादसा

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading