Bhusawal Breaking News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र जळगाव येथील जात पडताळणी समितीने अवैध ठरवले असून, या निर्णयामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणुकीदरम्यान सादर केलेल्या शपथपत्रात गायत्री भंगाळे यांनी अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र दाखल केले होते. हे प्रमाणपत्र भुसावळचे प्रांताधिकारी यांनी जारी केले होते. मात्र या प्रमाणपत्रावर आक्षेप घेत तक्रारी दाखल झाल्यानंतर प्रकरण जात पडताळणी समितीकडे वर्ग करण्यात आले.
जळगाव जात पडताळणी समितीचे अध्यक्ष बोदरडे, सदस्य एन. एस. रावते आणि एस. एस. महाजन यांच्या समितीने हा निर्णय दिल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे भुसावळ नगरपालिकेच्या सत्तासमीकरणावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आता पुढे काय कारवाई होणार? नगराध्यक्ष पदावर काय परिणाम होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Tags : bhusawal news, jalgaon news, gayatri bhangale, caste certificate invalid, bhusawal nagar palika, maharashtra politics, breaking news maharashtra, jalgaon caste verification, nagaradhyaksha news, political news maharashtra
#bhusawal #jalgaon #breakingnews #maharashtranews #politics #castecertificate #viralnews #localnews #india #newsupdate
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7