Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / पाठपुराव्याला यश : कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेस ₹२८१ कोटींची तत्वत: मान्यता

पाठपुराव्याला यश : कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेस ₹२८१ कोटींची तत्वत: मान्यता

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ विधानसभा मतदारसंघातील कृषी विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कुऱ्हा पानाचे उपसा सिंचन योजनेच्या क्र. १ व क्र. २ या प्रकल्पांना राज्य शासनाकडून सुमारे ₹२८१ कोटींची तत्वत: मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून सिंचन सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे.


या योजनेअंतर्गत कुऱ्हा पानाचे (१६५०.७२० हे.), खंडाळे (४१२.७९४ हे.), मोंढाळे (८०५.१९ हे.) आणि शिंदी (८८८.१२० हे.) या गावांतील एकूण ३७५६.८२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. परिणामी शेती उत्पादनक्षमतेत वाढ होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, या प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

NEET Paper Leak: बढ़ते दबाव के बीच केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, मोदी सरकार का बड़ा फैसला

NEET Paper Leak: बढ़ते दबाव के बीच केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, मोदी सरकार का बड़ा फैसला

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading