Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली; श्रीकांत धिवरे नवे पोलिस अधीक्षक

जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली; श्रीकांत धिवरे नवे पोलिस अधीक्षक

Jalgaon Breaking News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


राज्य शासनाच्या गृह विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या आदेशानुसार राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत ही बदली प्रक्रिया राबविण्यात आली.


या आदेशानुसार, जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली पुणे येथे राज्य गुन्हे अन्वेषण विभागात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी धुळेचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे.


दरम्यान, साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांची बदली सांगली येथे करण्यात आली असून पुणे येथील पोलिस उप आयुक्त निखिल पिंगळे यांची सातारा येथे पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांची बदली मुंबई येथे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलिस उप आयुक्त (सुरक्षा) पदावर करण्यात आली आहे.


तसेच, कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता यांना गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उप महानिरीक्षक म्हणून तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक निलोत्पल यांची बदली कोल्हापूर येथे करण्यात आली आहे.


याशिवाय, गडचिरोली येथील अपर पोलिस अधीक्षक एम. सेरा यांची पदोन्नती करून त्यांची पोलिस अधीक्षक, गडचिरोली म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे येथील पोलिस उप आयुक्त राजकुमार शिंदे यांची बदली वाशिम येथे पोलिस अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

NEET Paper Leak: बढ़ते दबाव के बीच केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, मोदी सरकार का बड़ा फैसला

NEET Paper Leak: बढ़ते दबाव के बीच केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा, मोदी सरकार का बड़ा फैसला

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading