Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / गॅस एजन्सी फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी जेरबंद

गॅस एजन्सी फोडून सिलेंडर चोरी करणारी टोळी जेरबंद

Jalgaon News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


जळगाव (प्रतिनिधी) : गॅस एजन्सीचे गोदाम फोडून मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


फैजपूर व वरणगाव पोलिस ठाण्यांत एप्रिल 2026 मध्ये स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. अज्ञात चोरट्यांनी गॅस एजन्सीचे गोदाम फोडून भरलेले व रिकामे सिलेंडर चोरी केले होते.

या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.


तपासादरम्यान गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शेख बिलाल शेख नबी (रा. कासोदा), वसीम खान शाबीर खान (रा. तांबापुरा) व चेतन सुरेश काळे (रा. नशिराबाद, ता. भुसावळ) यांचा समावेश आहे.


पोलिसांनी आरोपींकडून 62 भरलेले गॅस सिलेंडर (₹1,55,000), 95 रिकामे सिलेंडर (₹1,42,500) तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेड (₹1,30,000) असा एकूण ₹4,27,500 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.


ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. अटक आरोपींना पुढील तपासासाठी फैजपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

बुलंदशहर में मुकेश हत्याकांड के दो शूटर पुलिस मुठभेड़ में गिरफ्तार, गोली लगने के बाद अस्पताल में भर्ती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading