Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / नवी दिल्ली : ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’मुळे महिलांना राजकारणात नवे बळ — रक्षाताई खडसे

नवी दिल्ली : ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’मुळे महिलांना राजकारणात नवे बळ — रक्षाताई खडसे

Bhusawal News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


भारतीय जनता पक्ष मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’च्या दूरगामी परिणामांबाबत माहिती दिली. या वेळी त्यांनी या निर्णयाला भारताच्या लोकशाही इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगितले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणासाठी हा ऐतिहासिक कायदा करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. या अधिनियमांतर्गत लोकसभा व राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली असून, यामुळे महिलांच्या राजकीय सहभागाला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.


२०२९ पर्यंत महिला शक्तीला देशाच्या धोरणनिर्मितीच्या केंद्रस्थानी आणण्याचा सरकारचा संकल्प असल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले. महिला नेतृत्वामुळे शासनाच्या प्राधान्यक्रमांमध्ये सकारात्मक बदल घडतील तसेच जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.


‘नारी शक्ती वंदन अधिनियम’मुळे महिलांना केवळ योजनांच्या लाभार्थी न राहता देशाच्या विकासात धोरणनिर्मात्या म्हणून पुढे येण्याची संधी मिळणार असून, ‘विकसित भारत २०४७’च्या ध्येयपूर्तीत त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, नवी दिल्ली


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading