Bhusawal Crime News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

भुसावळ : अनेक जिल्ह्यांमध्ये साखळी चोरी (चेन स्नॅचिंग) करून दहशत माजवणारा कुख्यात गुन्हेगार सादिक अली उर्फ ‘आतंक’ इबादत अली इराणी याला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने (डी.बी. पथक) अत्यंत शिताफीने अटक केली आहे. आरोपी दीर्घकाळापासून महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये फरार होता.
गुप्त माहितीवरून सापळा रचून अटक
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपीच्या हालचालींबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर डी.बी. पथकाने सापळा रचत त्याला ताब्यात घेतले. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात तो अनेक दिवसांपासून फरार होता.
अनेक जिल्ह्यांत ‘मोस्ट वॉन्टेड’
तपासादरम्यान आरोपीने राज्यातील विविध भागांत चैन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. जळगाव जिल्ह्यासह वर्धा, बुलढाणा (शेगाव, नांदुरा, खामगाव), धुळे आणि संभाजीनगर या जिल्ह्यांतील अनेक पोलीस ठाण्यांत तो हवा होता.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) केदार बरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखाली हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, अमर आढाले, चंद्रकांत रायपूरकर, कोतकर आणि जीवन कपडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या अटकेमुळे राज्यातील चैन स्नॅचिंगच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता असून पोलीस प्रशासनाकडून पथकाचे कौतुक करण्यात येत आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7