दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय भुसावळ तसेच पंचायत समिती भुसावळ व राही शिक्षण संस्था मंडळ भुसावळ यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 24/09/2023 रोजी शामाप्रसाद मुखर्जी उद्यान व संतोष मुक्ती धाम मधील महादेव मंदिर परिसर येथे प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, चहाचे रिकामे कप,कागद, गवत, पालापाचोळा, काडीकचरा सर्व स्वच्छ करण्यात आले.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर पी फालक सर स्वतः उपस्थित होते व त्यांनीही श्रमदान केले तसेच पंचायत समितीचे पाणीपुरवठा स्वच्छता विभाग तालुका समन्वयक स्वप्निल आदीवाले, कृषी अधिकारी सुरवाडे साहेब, कृषी विस्तार अधिकारी जेय नकार साहेब, वरिष्ठ लिपिक गिरीश एदलाबादकर, विजतंत्रि अधिकारी राजेंद्र झटकार, राही कॉम्प्युटरचे संचालक बाळकृष्ण पवार उपस्थित होते व त्यांनी ही श्रमदान केले सदर कार्यक्रमाकरिता कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आर बी ढाके, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.माधुरी पाटील, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.आर डी भोळे, प्रा. डॉ.अनिल सावळे, प्रा. संगीता धर्माधिकारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी व क्रीडा संचालक डॉ. संजय धर्मा चौधरी सर यांनीही परिश्रम घेतले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ