Breaking News
BigRoz Big Roz
Home / Maharashtra / अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई | खबर 24 एक्सप्रेस

अवैध गौण खनिज वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई | खबर 24 एक्सप्रेस

भुसावळ तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव मंडळ क्षेत्रात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. मंडळ अधिकारी रजनी तायडे यांच्या नेतृत्वाखाली तलाठी सुप्रिया बिराजदार, रेणुका पाटील, नितीन केले, रोशन कापसे आणि जितेश चौधरी यांनी कारवाई केली.

तपासणीदरम्यान नागेश्वर मंदिर परिसर भागात विल्हाळे गावाच्या दिशेने वरणगावकडे येत असतांना काही अवैध मुरूम वाहतूक करणारी वाहने आढळून आली.

वाहनांचा तपशील –

विष्णू भानुदास गाजरे (रा. आचेगाव) यांचे ट्रॅक्टर (MH 19 EA 4246) — अंदाजे १ ब्रास मुरूम

आकाश संजय पाटील (रा. दर्यापूर) यांचे ट्रॅक्टर (MH 10 Z 4835) — अंदाजे २ ब्रास मुरूम

विना क्रमांकाचे जेसीबी — कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्यामुळे चौकशी कामी जप्त

डंपर (MH 19 CY 0066) — अंदाजे ४ ब्रास डबर, मालक राजेंद्र सिंग किशनवत

सदर वाहनचालकांकडे मुरूम वाहतुकीचे कोणतेही वैध परवाने अथवा पावत्या नसल्यामुळे सर्व वाहने व खनिज जप्त करून पंचनामा करण्यात आला. काही वाहनचालकांनी सहकार्य न केल्यामुळे पोलिस व प्रशासनाच्या मदतीने वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली.

अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अशा मोहिम नियमित राबविण्यात येतील असेही तहसीलदार नीता लबडे यावेळी सांगितले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ

.

.

.

.


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

नुतन एडीआरएम प्रवीण पाठक यांचा सत्कार; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या

नुतन एडीआरएम प्रवीण पाठक यांचा सत्कार; रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्या

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe