
Akash Dhake | भुसावळ | ७ ऑक्टोबर २०२५: भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी तर्फे सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी भुसावळ येथे “आत्मनिर्भर भारत – जीएसटी – नेक्स्ट जनरेशन 2” या विषयावर व्यापारी संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले. श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थान परिसरात झालेल्या या संमेलनात शहरातील व्यापारी बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारत माता आणि पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून संमेलनाची सुरुवात झाली. या वेळी महाराष्ट्राचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, भाजप जळगाव जिल्हा (पूर्व) माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जिल्हा सरचिटणीस परीक्षित बऱ्हाटे, डॉ. केतकी पाटील, राधेश्याम लाहोटी, अशोक नागरानी, गुड्डू अग्रवाल, चंद्रशेखर अग्रवाल, पिंटू कोठारी, मनोज बियाणी, युवराज लोणारी, प्रा. दिनेश राठी, रिषभ राजपूत, उत्तर मंडळ अध्यक्ष संदीप सुरवाडे, दक्षिण मंडळ अध्यक्ष किरण कोलते तसेच विषयाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. निखिल वायकोळे उपस्थित होते.
जीएसटीतील सुधारणा आणि व्यापाऱ्यांसाठीच्या संधींवर मार्गदर्शन
कार्यक्रमात सर्वप्रथम राधेश्याम लाहोटी आणि अशोक नागरानी यांनी जीएसटीच्या तांत्रिक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा. डॉ. निखिल वायकोळे यांनी “जीएसटीमधील नव्या सुधारणा आणि व्यापाऱ्यांसाठी निर्माण झालेल्या नव्या संधी” या विषयावर सखोल विवेचन केले.
आत्मनिर्भर भारत आणि सरकारी योजना
भाजप नेते चंद्रकांत बाविस्कर आणि मंत्री संजय सावकारे यांनी केंद्र सरकारच्या “आत्मनिर्भर भारत” या संकल्पनेबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या विविध व्यापारी कल्याणकारी योजनांबाबत देखील मार्गदर्शन केले.
मंत्री संजय सावकारे म्हणाले, “जीएसटी दरात झालेल्या कपातीमुळे ग्राहकांची खरेदी क्षमता वाढेल आणि व्यापारी वर्गालाही त्याचा थेट फायदा होईल. स्वदेशी वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देणे हे राष्ट्रसेवेतले मोठे पाऊल आहे. प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या दुकानात जीएसटी आणि स्वदेशी वस्तूंविषयी माहितीचे फलक लावून लोकजागृती करावी.”
व्यापाऱ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग
या व्यापारी संमेलनाचे संचालन उत्तर मंडळ अध्यक्ष संदीप सुरवाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन दक्षिण मंडळ अध्यक्ष किरण कोलते यांनी केले. भुसावळ शहरातील शेकडो व्यापारी या संमेलनाला उपस्थित होते आणि संपूर्ण कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
ब्युरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines Khabar 24 Express Indias Leading News Network, Hindi News – Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines, current affairs, cricket, sports, business and cinema, Latest Hindi News, Breaking News in Hindi, Bollywood Gossip, Bollywood News, Top Hindi News Channel, Khabar 24 Express Live TV, Khabar24, Khabar24 Express