
आकाश ढाके, जळगाव : राज्य शासनाने आज सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले असून, त्यामध्ये जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्याचाही समावेश आहे. विद्यमान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करून त्यांना नाशिक जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची पदोन्नतीवर जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार, रोहन घुगे यांनी आपला सध्याचा कार्यभार विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या सल्ल्याने इतर अधिकाऱ्याकडे सुपूर्द करून जळगाव जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार विद्यमान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून त्वरित स्वीकारावा, असे नमूद करण्यात आले आहे.
ठाण्यातील कार्यकाळात रोहन घुगे यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रशासनिक सुधारणा आणि लोकहिताचे प्रकल्प यशस्वीरीत्या राबवले आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे स्थानिक प्रशासन अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख बनले. आता ते जळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार असून, त्यांच्या कामकाजाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7