Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / शहीद राकेश शिंदे शासकीय आयटीआय भुसावळ येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम

शहीद राकेश शिंदे शासकीय आयटीआय भुसावळ येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम

शहीद राकेश शिंदे शासकीय आयटीआय भुसावळ येथे 12 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उद्योजकता प्रेरणा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या कार्यक्रमात राष्ट्रीय युवा दिना निमित्त स्वामी विवेकानंद यांच्या विचाराने युवा पिढी प्रेरीत होऊन शिक्षण उद्योजक व देश सेवेसाठी आपल्या युवाशक्तीचा जास्तीत जास्त व समाजाच्या कल्याणासाठी कसा उपयोग करता येईल यावर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य एम एस राजपूत यांनी केले त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली तसेच संस्थेस शहीद राकेश शिंदे यांचे नाव देण्याबाबत ची माहिती व या संस्थेत उपलब्ध असलेल्या विविध व्यवसायाबाबतची व योजनांची माहिती उपस्थितांना दिली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी सांगितले की युवकांनी शिक्षण घेत असतांना कठोर मेहनत केली पाहिजे आणि ज्या पद्धतीने स्वामी विवेकानंदांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या व देशाच्या कल्याणासाठी केला तसा उपयोग करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपल्या या ज्ञानाचा व शक्तीचा उपयोग कोणत्याही प्रकारच्या गैर कृत्यासाठी न करता आपण एक जागृत नागरिक कसे बनणार याकडे जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे. अमोल व्ही मुठे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनपटातील विविध पैलूंची माहिती व राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची माहिती सर्व विद्यार्थ्यांना दिली. एल. आर. पाटील यांनी स्वामी विवेकानंद यांचे कौशल्य विचार व आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून विदेशातील नोकरीच्या संधी व शासनाने आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी जपान जर्मनी इस्रायल आणि फ्रान्स या देशांमध्ये विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून विद्यार्थ्यांना विविध चार भाषांचे जपानी हिब्रू जर्मन आणि फ्रेंच प्रशिक्षण देण्याची व्यवस्था शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे याबाबत माहिती दिली तसेच शासनाने कुऱ्हे पानाचे येथील कारगिल युद्धात शहीद झालेले शहीद राकेश शिंदे यांचे नाव शासकीय आयटीआय भुसावळ या संस्थेत दिले आहे. त्यामुळे भुसावळ शासकीय आयटीआय चे नाव शहीद राकेश शिंदे शासकीय आयटीआय भुसावळ असे झाले त्यामुळे शहीद राकेश शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती अनुसयाबाई शिंदे यांचा सत्कार संस्थेच्या वतीने त्यांना साडीचोळी देऊन करण्यात आला, तसेच त्यांच्या परिवारातील किशोर सुरेश शिंदे व इतर सदस्यांचा यथोचित सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमास संस्थेतील सर्व विद्यार्थी व कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. बी. ढोले यांनी केले तर आभार प्रदर्शन जे. झेड. तायडे यांनी केले तसेच या कार्यक्रम यशस्वीतेसाठी आय. आर. मोरे, के. बी. चौधरी जे. जी. कोळी, डी. एस. कोळी, ए. एम. गावंडे, के. पी. राठोड, एस. के. गाजरे, आर. आर. देवकर, एच. इ. पाने, बी. टी. पाटील, डी. एन. भिरूड, स्वाती देशकर, जे. वी. भोळे, ए. वी. तानकर, के, एम. भोळे, डी. के. शिवरामे, डी. व्ही. गाढे, के. डी. चौधरी, एस. एन. पाटील, डी. डी. चौधरी, एम. एम. केले, एम. एस. बनसोडे व संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ

Follow us :

Check Also

Chhattisgarh के सभी 10 निगमों में BJP के महापौर, निकाय चुनावों में Congress का सूपड़ा साफ

छत्तीसगढ़ में नगरीय निकाय चुनावों के परिणाम घोषित हो गए हैं। वोट काउंटिंग में शुरूआत …

Leave a Reply

error

Enjoy khabar 24 Express? Please spread the word :)

RSS
Follow by Email
YouTube
YouTube
Set Youtube Channel ID
Pinterest
Pinterest
fb-share-icon
LinkedIn
LinkedIn
Share
Instagram
Telegram
WhatsApp