
आज मुंबई येथे देशाचे चाणक्य म्हणून ज्यांना संबोधले जाते असे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार साहेब यांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. साहेबांनी पुन्हा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्याबद्दल अभिनंदन केले.

महाराष्ट्र राज्य ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी राज्यातील ओबीसी समाजाला केंद्र आणि राज्य सरकारची सातत्याने सापत्नीक भूमीका ही ओबीसींना नामशेष करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे, यासाठी आपणास संघटनात्मक कार्य करून दोन दिवसीय शिबिर आयोजित करावे, तसेच आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ओबीसींना कसा न्याय देता येईल, तरुण पिढीला जास्तीत जास्त राजकीय प्रवाहात आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे अशा विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी जळगांव जिल्हा अध्यक्ष तथा उत्तर महाराष्ट्र प्रभारी उमेश नेमाडे, प्रदेश उपाध्यक्ष बापू महाजन, प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर, उपाध्यक्ष दत्तात्रय अनारसे, राज्य सोशल मीडिया प्रमुख अतुल राऊत, विलास मगरे, नागपूर शहर अध्यक्ष अरविंद भाजीपाले, प्रदेश उपाध्यक्ष, नीळकंठ पिसे, राजेश बागुल हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ